scorecardresearch

Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने एकूण दहा कोटींचा गल्ला जमवला.

Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत
फोटो सौजन्य : लोकसत्ता

जिनिलीया देशमुख हिने नुकतंच ‘वेड’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटगृहाचे चित्रपट गृहात यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने एकूण दहा कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील जिनिलीयाच्या कामाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता जिनिलीयाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘वेड’ या चित्रपटात जिनिलीयाने ‘श्रावणी’ हे पात्र साकारलं आहे. श्रावणीचा साधेपणा, ती करत असलेला जीवापाड प्रेम शिक्षकांना खूपच आवडलं. तिच्या कामाबद्दल सोशल मीडियावरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता एक पोस्ट शेअर करत जिनिलीयाने सर्वांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

वेळ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा एक व्हिडीओ तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.” तिचा हा व्हिडीओ आणि तिने दाखवलेला नम्रपणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण हा चित्रपट आवडल्याचं सांगत आहेत. अनेकांनी तिच्या कामाचं कौतुक कमेंट्स करत केलं, तर अनेकांनी “यापुढेही तुला मराठी चित्रपटांमध्ये बघायला आवडेल,” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:34 IST

संबंधित बातम्या