रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाने तब्बल दहा वर्षांनंतर कलाविश्वात पुनरागमन केलं.

‘वेड’मधील जिनिलीयाने साकारलेली श्रावणीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जिनिलीया एक उत्तम अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून कलाविश्वात पदार्पण केलेल्या जिनिलीयाने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. परंतु, रितेश देशमुखशी विवाह बंधनात अडकल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. आता वेड चित्रपटातून तिने पुनरागमन केल्याने चाहतेही आनंदी आहेत.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

हेही वाचा>>चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर उर्फीचं ट्वीट, म्हणाली “आत्महत्या करण्यासाठी…”

हेही वाचा>>कुणी नस कापली तर कुणी विषप्राशन केलं; प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांनी आत्महत्या का केल्या होत्या?

‘वेड’नंतर आता जिनिलीयाच्या पुढच्या चित्रपटांबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. जिनिलीयाने नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आगामी चित्रपटांबाबत भाष्य केलं आहे. जिनिलीया लवकरच दिग्दर्शक मानव कौल यांच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव जिनिलीयाने गुलदस्त्यात ठेवलं असलं, तरी या सिनेमातील भूमिकेबाबत तिने सांगितलं. या चित्रपटात जिनिलीया सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय एका दाक्षिणात्य चित्रपटातही ती झळकणार आहे.

हेही वाचा>>“आय एम गौरव मोरे…” दुबईतही फिल्टरपाड्याच्या बच्चनची हवा; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

‘तुझे मेरी कसम’, ‘जाने तू या जाने ना’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या बॉलिवूड चित्रपटातून जिनिलीयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर ‘हॅपी’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘बोमारिलू’ या दाक्षिणात्य चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. ‘वेड’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली जिनिलीया पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे.