scorecardresearch

गिरीजा ओक करणार मनमोहक अदांनी घायाळ, ‘गोष्ट एका पैठणीची’ मधील ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री गिरीजा ओक हिने ही लावणी सादर केलेली आहे.

गिरीजा ओक करणार मनमोहक अदांनी घायाळ, ‘गोष्ट एका पैठणीची’ मधील ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यात एका पैठणी घेण्याचे स्वप्न असलेल्या गृहिणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक प्रवास आहे. नुकतीच ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटातील एक ठसकेबाज लावणी सर्वांच्या भेटीला आली आहे. या लावणीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री गिरीजा ओक हिने ही लावणी सादर केलेली आहे.

‘तुमच्यासाठी रेडी राया नेसून पैठणी’ असे या गाण्याचे बोल आहेत. यात गिरीजा ओक ही पैठणी नेसून, मनमोहक अदांनी घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. बेला शेंडे यांच्या आवाजाने या लावणीला चारचांद लागले आहेत. तर या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक – गणेश यांचे आहे. गिरीजा ओक -गोडबोले आणि मिलिंद गुणाजी यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात पैठणीचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे.
आणखी वाचा : “तू आणि मी एकत्र…” मानसी नाईकच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

“महाराष्ट्राचे महावस्त्र असणाऱ्या पैठणीचे सौंदर्य प्रत्येकाला भारावणारे आहे. या चित्रपटात ‘पैठणी’ सुद्धा एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे. पैठणीचे सौंदर्य आम्ही या लावणीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर बोल असणारी ही लावणी ठेका धरायला लावणारी आहे. गाण्याच्या रेकॅार्डिंगदरम्यान बेलाही खूप एन्जॅाय करून गात होती. त्यामुळे तिला बघून आम्हीही हे गाणं तितकंच एन्जॅाय केले”, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी दिली आहे.

“या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना मलाही खूप मजा आली. हे गाणं गाताना आम्ही एवढी धमाल केली तर प्रेक्षकांना तर हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल”, अशी प्रतिक्रिया गायिका बेला शेंडे यांनी दिली आहे.

आणखी वाचा : “बिलुड्या लव्ह यू…” ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकाराची गर्लफ्रेंडसाठी रोमँटिक पोस्ट

‘गोष्ट एका पैठणीची’ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 21:08 IST

संबंधित बातम्या

व्हिडिओ