सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. अलिकडेच दिवाळीच्या ऐन मुहुर्तावर मराठीमधील असाच एक बुहचर्चित ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. तो चित्रपट म्हणजे ‘हर हर महादेव’ मराठीसह हा चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पण सध्या या चित्रपटावरुन बरेच वाद सुरु झाले आहेत. तसेच या वादाला राजकीय वळण मिळाले आहे. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘हर हर महादेव’ने धुमाकूळ घालता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – अक्षय कुमार, अजय देवगणचे बिग बजेट चित्रपट सुपरफ्लॉप अन् ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांची पसंती, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचं बोललं जात आहे. पण या चित्रपटाला प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

‘हर हर महादेव’मध्ये बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होतं याबाबत सांगितलं. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली.

आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा

तसेच या चित्रपटामधील अभिनेता हार्दिक जोशीनेही चित्रपटाचे शो हाऊस फुल असल्याचं सोशल मीडियाद्वारे म्हटलं होतं. ‘हर हर महादेव’चं लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har har mahadev marathi movie day 1 box office collection actor sharad kelkar share post on instagram see details kmd
First published on: 09-11-2022 at 12:22 IST