Hemal Ingle Bride To Be Party : मराठी कलाविश्वात गेल्या वर्षात अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली. शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे, पूजा सावंत अशा अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री हेमल इंगळेही लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हेमलचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. आपला बॉयफ्रेंड रोनक बरोबर ती विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच हेमलने तिच्या bride to be पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेमलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या मैत्रिणीसमवेत बसली असून एक केक कापताना दिसत आहे. हेमल जेव्हा केक कापते तेव्हा तिच्या मैत्रिणी ब्रायडल शॉवर टू यू अस म्हणत जल्लोष करताना दिसत आहेत. हेमलच्या मैत्रिणी तिच्या नावासह फियोन्से फियोन्से अस म्हणतात. यानंतर ती मिस हेमल नाही तर मिसेस हेमल होणार अस म्हणतात. यानंतर हेमल तिच्या मैत्रिणींनी केक भरवते.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक

हेही वाचा…लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

हेमलने मानले मैत्रिणींचे आभार

हेमलने हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देत त्यात लिहिलं की, “या खोलीत माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमळ लोक एकत्र आहेत. हे सर्व हे सगळं जुळवून आणल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! माझ्यासाठी प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता, आणि ही आठवण मी आयुष्यभर जपेन! पण आत्ता, तुम्हा सगळ्यांबरोबर केक कापतानाचा हा भन्नाट व्हिडीओ शेअर करायला मला खूप आवडेल. हा व्हिडीओ माझ्या मैत्रीचं सार मांडतो.”

ऑगस्ट महिन्यात झाला होता हेमलचा साखरपुडा

ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत हेमलने (Hemal Ingle) इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर होता. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत अभिनेत्रीने साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.

हेही वाचा…“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

हेमलच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमाने नुकतंच सिनेमागृहात ५० दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमात हेमलने स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. हेमलच ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमातील कामामुळे कौतुक होत आहे.

Story img Loader