scorecardresearch

Video: “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते” म्हणणाऱ्यांना हेमांगी कवीचं जशास तसं उत्तर, व्हिडीओ चर्चेत

तिच्या पोस्ट्समुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. आता त्या ट्रोलर्सना तिने एका पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

Video: “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते” म्हणणाऱ्यांना हेमांगी कवीचं जशास तसं उत्तर, व्हिडीओ चर्चेत

सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एखादा सामाजिक विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी ही अभिनेत्री फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या पोस्ट्समुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. आता त्या ट्रोलर्सना तिने एका पोस्टच्या माध्यमातून हटके उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा पडली प्रेमात; फोटो पोस्ट करत म्हणाली…

हेमांगी कवीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत तिने सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेल्या एका म्युझिकवर ताल धरला आहे. त्यात दोन फ्रेम मध्ये ती त्या म्युझिकची स्टेप करताना दिसत आहे. एका फ्रेमवर लिहिलेलं आहे की, “ही काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते.” तर दुसऱ्या फ्रेमवर लिहिलं आहे, ही “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते.” या दोन्ही ठिकाणी तिने त्या त्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स दिले आहेत.

हेही वाचा : ‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी

हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “इंडस्ट्रीतील काही लोकांच्या, माझ्या कुटुंबातील काही लोकांच्या, काही खास मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, तसंच माझे ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी…अलग से !” हेमांगीच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या मूकपणे दिलेल्या उत्तराचं कौतुक केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:34 IST

संबंधित बातम्या