मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सध्या त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा हेमंत अनेकदा त्याच्या चित्रपटांसंबंधी अपडेट चाहत्यांशी शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. मराठी चित्रपट आणि बॉक्स ऑफिसबद्दल हेमंत ढोमेनं केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला ‘सनी’ हा मराठी चित्रपट सध्या बराच गाजतोय. घरापासून दूर असलेल्या एका तरुणाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण असं असताना ही काही प्रेक्षकांना मात्र तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात आल्याचं सांगितलं. यासंबंधी ट्वीट करून हेमंत ढोमेने मराठी चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

आणखी वाचा- “मला राजकारणात…” राजकीय प्रवेशाच्या चर्चांवर हेमंत ढोमेचे थेट वक्तव्य

मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंत ढोमेने खरमरीत ट्वीट केलं आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 कल्याणमधला हा प्रकार… प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणं चूक की बरोबर?” तसेच आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्याने, “दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?” असंही म्हटलं आहे.

हेमंत ढोमेच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. आपल्या कमेंट्समधून युजर्सनी हेमंतच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही केवळ हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन देत मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय केला जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अर्थात या आधीही एक प्रेक्षकाबरोबर असा प्रकार घडला होता आणि त्याकडेही हेमंत ढोमेने लक्ष वेधलं होतं.

आणखी वाचा- “म्हणजे तिकीट दर कमी असतील तर … ” अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

दरम्यान हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ सनी ‘ चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.