scorecardresearch

एका गाण्यासाठी रंगवलं अख्खं गाव; हेमंत ढोमेने सांगितला ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा किस्सा

हे गाणं चित्रित करण्यापूर्वी हेमंत ढोमेच्या डोक्यात काही कल्पना होत्या.

hemant dhome

हेमंत ढोमेच्या ‘सातारचा सलमान’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमेही या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसला होता. ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतो. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. या गाण्यामागची एक रंजक गोष्ट दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितली आहे.

‘बेशरम रंग’ गाण्यावरील वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पदुकोण; म्हणाली, “मी व शाहरुख खान…”

हा चित्रपट हेमंतसाठी खास आहे, त्यामुळे हे गाणं चित्रित करण्यापूर्वी त्याच्या डोक्यात काही कल्पना होत्या. हे गाणं खूपच उत्स्फूर्त व जल्लोषमय असल्याने शूटिंगचा परिसरही त्याला तसाच कलरफूल आणि उत्साहवर्धक हवा होता. गाण्याच्या नावाप्रमाणे याचं शूटिंगही साताऱ्यातील गावांमध्ये करण्यात आलं. तिकडे रंगीबेरंगी घरं दिसण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे हेमंतने गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचं ठरवल. गावकऱ्यांनीही हेमंतच्या या निर्णयावर संमती दर्शवली.

घरं रंगवायला सुरुवात झाल्यानंतर गावकरी त्यांच्या घरासाठी आवडीचे रंग सुचवत होते. माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या, असं ते म्हणत होते. अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते, तेच गाण्यात उतरलं. शुटिंग संपलं असलं तरी साताऱ्यातील केंजळ या गावात ही रंगीबेरंगी घरं तशीच आहेत.

दरम्यान, या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या ३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 14:43 IST