मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या सई ही तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. नुकतंच सईने तिने तिचे नवीन घर कसे शोधले, याबद्दल खुलासा केला आहे.
सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी तिचं युट्यूब चॅनेल सुद्धा सुरु केलं आहे. या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओद्वारे तिने तिच्या आलिशान घराची पहिली झलकही चाहत्यांना दाखवली आहे. नुकतंच तिने तिचा घर घेण्याचा प्रवास आणि मुंबई याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : …म्हणून सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं घर, म्हणाली “मला या शहराचा…”
सई ताम्हणकर काय म्हणाली?
“मी तुम्हाला खर सांगू तर घर घेण्याचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. मला लॉकडाऊनमध्ये एक दिवस खूप कंटाळा आला होता. त्यामुळे मग मी कंटाळा घालवण्यासाठी चला आपण घर शोधूया, असं ठरवून बाहेर निघाले.
कारण मी जर आता त्याची सुरुवात केली तर मला ६ महिने किंवा वर्षभराने घर सापडेल. पण सध्या मी जे घर घेतलंय ते माझं तिसरं घर होतं जे मी पाहिलं. त्यानंतर मी त्या घराची स्वप्न पाहू लागले आणि मग मी हे घर बुक केलं. आता मला त्याचा फार अभिमान वाटतोय.
मुंबईत घर घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की जर मी हे करु शकते तर कोणीही हे करु शकतं. यासाठी तुम्ही फक्त मनाशी पक्का निश्चय करायला हवा”, असे सई ताम्हणकर म्हणाली.
आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”
दरम्यान सई ताम्हणकर ही मूळ सांगलीची आहे. २००५ मध्ये सई मुंबईत आली. यानंतर सईने अनेक वर्ष मेहनत केली. या काळात सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला तिने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.