‘महाराष्ट्राची कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. अभिनेत्रीचा विवाहसोहळा फेब्रुवारी महिन्यात थाटामाटात पार पडला होता. पूजाच्या लग्नाला कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित होती. थाटामाटात लग्न झाल्यावर अभिनेत्री काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाला गेली.

पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे ती सुद्धा लग्नानंतर काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली. परदेशात अभिनेत्रीने लाडक्या नवऱ्याबरोबर एकत्र होळी व गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता. यातील एका व्हिडीओमध्ये पूजाच्या ऑस्ट्रेलियातील घराची संपूर्ण झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाली होती.

लग्नाआधी पूजाला लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार की नाही? असं विचारण्यात आलं होतं. यावर “काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.” असं पूजाने सांगितलं होतं.

हेही वाचा : Video : अजरामर गीतरामायण ते बाबुजींचा खडतर प्रवास! ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात आहेत एकूण २७ गाणी

ऑस्ट्रेलियात दीड महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर आता इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत पूजाने मुंबईत परतल्याचे संकेत दिले आहेत. या स्टोरीमध्ये विमान लँड करत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. याशिवाय विमानाच्या खिडकीतून हा व्हिडीओ काढल्यामुळे संपूर्ण शहराची झलक यामध्ये दिसत आहे. पूजाने या व्हिडीओला “लागली ओढ मन हे लई द्वाड…आताच बया का बावरलं” हे गाणं जोडलं आहे. तसेच याच्या कॅप्शनमध्ये तिने “There She is” असं लिहिलं आहे.

हेही वाचा : अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा

पूजा सावंत इन्स्टग्राम स्टोरी

दरम्यान, व्हिडीओला लावलेलं मराठी गाणं, विमानतळाच्या स्टोरीज यावरून पूजा पुन्हा मुंबईत परतली का? अशा चर्चा रंगल्या आहेत. एकंदर व्हिडीओ पाहता आणि गाणं बघता ती मुंबईला येत असावी असं वाटतंय पण, पूजाने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.