Marathi Actor Jaywant Wadkar Daughter’s Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांच्या लेकीचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. स्वामिनी वाडकरच्या लग्नाला तिचे जवळचे मित्रमंडळी आणि इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार उपस्थित होते. स्वामिनीच्या हळदीचे आणि लग्नसमारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्वामिनीने दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे. तिचा पती पती वरुण नायर हा मल्याळी आहे. त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस असल्याचं वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे. भरजरी साडी, दागिने या साऊथ इंडियन लूकमध्ये स्वामिनी खूपच सुंदर दिसतेय.

स्वामिनीच्या विवाहसोहळ्याला अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे, शार्दुल पाटकर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. स्वानंदी बेर्डेची स्वामिनी फार जवळची मैत्रीण आहे. ती म्हणते, “हा लग्नसोहळा साऊथ इंडियन प्लस मराठमोळा असा दोन्ही आहे. मी तिच्यासाठी खूप जास्त खूश आहे. तिचं लग्न आहे म्हटल्यावर मला मनात इतकी धडधड होत होती…फायनली तिचं लग्न होतंय आणि मन भरून आलंय.”

जयवंत वाडकरांनी आणि त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत लेक अन् जावयाविषयी सांगितलं होतं. “दोघेही स्वामीभक्त एकमेकांना भेटले त्यामुळे मला खूप आनंद आहे. यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. स्वामिनीच्या आयुष्यात आलेला मुलगा वरुण हा सुद्धा स्वामीभक्त आहे. हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या दोघांच्या डोक्यावर कायम स्वामींचा आशीर्वाद असेल. मला माहिती नव्हतं की, वरुण मल्याळम असून केरळचा असूनही स्वामींचा भक्त आहे. मी दोघांसाठीही खरंच खूप आनंदी आहे.”

swamini wadkar wedding
जयवंत वाडकर यांच्या मुलीचं लग्न ( फोटो सौजन्य : राजश्री मराठी )

दरम्यान, स्वामिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर स्वामिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. ‘अशी ही आशिकी’, ‘बाबा’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये तिने काम केलेलं आहे. याशिवाय ‘HC London’ या कंपनीची ती ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे.