‘झिम्मा २’ चित्रपटामुळे सध्या हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी चांगलीच चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्यात दोघांनीही २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या सुखी संसाराल ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने हेमंतने लाडक्या बायकोसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेमंत आणि क्षितीची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती. त्याआधी दोघेही एकमेकांना ओळखत होते परंतु, त्यांच्यात मैत्री या नाटकाच्या निमित्ताने झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही याबद्दल घरच्यांना कल्पना दिली. दोन्ही कुटुंबांकडून हेमंत-क्षितीच्या नात्याला परवानगी मिळाल्यावर त्यांनी लगेच घरच्या घरी साखरपुडा केला आणि त्यानंतर वर्षभराच्या आत दोघांचं लग्न झालं.

हेही वाचा : “माझी बायको ६ महिन्यांची गरोदर…”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं ‘असं’ उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

आज त्यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने हेमंतने लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली! या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली! तुला तर माहितीच आहे क्षिती आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे… गाणं पण तेच आहे…(या गाण्यावर पटली राव! )” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे.

दरम्यान, लग्नाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्ताने हेमंत-क्षितीवर सध्या त्यांच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मधुराणी प्रभुलकर, नम्रता संभेराव, पूजा सावंत, समीर विध्वंस, सोनाली खरे अशा अनेक कलाकारांनी हेमंत-क्षितीच्या फोटोवर कमेंट्स करत दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय दोघांच्या ‘झिम्मा २’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळत आहे.

Story img Loader