scorecardresearch

Premium

“मला सिनेमात घेतलं की…”, शिवानी सुर्वेने ‘झिम्मा २’साठी हेमंत ढोमेला पाठवलेली जन्मपत्रिका, किस्सा सांगत म्हणाली…

“माझ्या जन्मपत्रिकेत काहीच दोष…”, शिवानी सुर्वेची ‘झिम्मा २’साठी ‘अशी’ झाली निवड! अभिनेत्री म्हणाली…

jhimma 2 fame shivani surve reveals her funny casting incident
'झिम्मा २' फेम शिवानी सुर्वे व दिग्दर्शक हेमंत ढोमे

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘झिम्मा’च्या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात सगळ्या बायका लंडन ट्रिपला गेल्या होत्या. आता या दुसऱ्या भागात सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरू व शिवानी सुर्वे या अभिनेत्रींची नव्याने एन्ट्री झाली आहे. या दोघीही पहिल्या भागात नव्हत्या. यात रिंकूने ‘तान्या’, तर शिवानी सुर्वेने ‘मनाली’ ही भूमिका साकारली आहे. ‘झिम्मा २’ साठी शिवानीची निवड कशी झाली? याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

शिवानी सुर्वे मनालीच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली, “मी आणि हेमंतने यापूर्वी एकत्र काम केलंय. त्याला मी ‘वाळवी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बोलावलं होतं. तेव्हा हेमंत ‘झिम्मा २’चं कास्टिंग करतोय याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी अगदी सहज त्याला म्हणाले तुला वाटतंय का माझ्यात काही समस्या आहे? म्हणून तू मला तुझ्या चित्रपटात पुन्हा घेतलं नाहीस बरोबर? त्याला सुरुवातीला काही समजलंच नाही मी नेमकं काय बोलतेय. यामागचं कारण असं की, आम्ही एकत्र एक सिनेमा केला होता त्याला प्रदर्शित व्हायला तब्बल चार ते साडे चार वर्ष लागली होती.”

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
vivek angihotri praised baipan bhari deva movie and kedar shinde
‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”
actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”

हेही वाचा : ठरलं तर मग : आदेश बांदेकरांची निर्मिती, तमिळ रिमेक ते दमदार टीआरपी! सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला १ वर्ष पूर्ण

शिवानी पुढे म्हणाली, “मला सिनेमात घेतलं की वेळ लागतो असा काही तुझा गैरसमज झालाय का? ही घे माझी पत्रिका…यात काहीच दोष नाहीये त्यामुळे मला कास्ट कर… असं माझं आणि हेमंतचं बोलणं झालं होतं. त्याला ही गोष्ट मी अगदी गमतीत सांगितली होती.”

हेही वाचा : “अभिनयला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या अन्…”, प्रिया बेर्डेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाल्या, “लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा…”

“दोन-चार दिवसांनी मला खरंच हेमंतचा फोन आला आणि तो मला म्हणाला, शिवानी पत्रिका कामी आली. माझ्या चित्रपटात अशी एक भूमिका आहे तू करशील का? अर्थात गमतीचा भाग बाजूला राहिला. मी मनालीची गंभीर भूमिका करू शकते असा त्याला विश्वास होता. हेमंतला हा विश्वास वाटणं हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. क्षिती आणि हेमंतचं ‘झिम्मा’ या विषयावर खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे त्यांना जवळच्या वाटणाऱ्या चित्रपटात त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.” असं शिवानी सुर्वेने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhimma 2 fame shivani surve reveals her funny casting incident for hemant dhome movie sva 00

First published on: 05-12-2023 at 10:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×