scorecardresearch

Video ‘झिम्मा २’ ची परदेशात क्रेझ; लंडनमधील तरुणींनी केला ‘मराठी पोरी’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

लंडनमध्ये राहणाऱ्या काही भारतीय तरुणींनी ‘झिम्मा २’ मधील गाण्यावर डान्स केला आहे.

marathi pori song
लंडनमधील तरुणींनी केला 'मराठी पोरी' गाण्यावर भन्नाट डान्स

सध्या मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या चित्रपटातील “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” या गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सर्वसामान्यांबरोबर अनेक कलाकारांनीही या गाण्यावर रील बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा- असाच नवरा हवा गं बाई! सायली संजीवने सांगितल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा; म्हणाली, “जितकं प्रेम…”

ashok saraf
Video “पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही का?” मराठी अभिनेत्याला दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज
sankarshan vc
“बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे…,” संकर्षणने शेअर केलं लेकीबरोबरचं गोड संभाषण, म्हणाला…
vikrant-massey-and-his-wife-sheetal-thakur
“आम्ही पालक बनणार”; मिर्झापूर फेम विक्रांत मेस्सीने दिली गोड बातमी; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
meri umar ke berojgaro
Video: “मेरी उमर के बेरोजगारो..जाति-धरम के चष्मे उतारो”, सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ!

भारताबरोबर परदेशातही ‘मराठी पोरी’ गाण्याची अनेकांना भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. लंडनमध्येही ‘झिम्मा २’ आणि ‘मराठी पोरी’ गाण्याची क्रेझ बघायला मिळत आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या काही भारतीय मुलींनी ‘मराठी पोरी’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सात जणी भारतीय वेषात ‘मराठी पोरी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर क्षिती जोगने ‘मस्त’ असं लिहित कमेंट केली आहे.

‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकरांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. ‘झिम्मा’ला मिळालेल्या य़शानंतर आता ‘झिम्मा २’ बाबत सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhimma 2 indian girls dance on marathi pori song in london video viral dpj

First published on: 20-11-2023 at 18:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×