scorecardresearch

आता पुन्हा उलगडणार ट्रीपमधील मजा; ‘झिम्मा २’ मधील दुसरं गाणं प्रदर्शित

‘झिम्मा २’ मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

jhimma 2 new song
‘झिम्मा २’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. २०२१ साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांमध्ये या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे.

हेही वाचा- प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळालं पत्ररुपी बक्षीस, म्हणाली “चित्रपट प्रदर्शनापूर्वीच…”

salman-khan-tiger-3-trailer-date-out
Tiger 3 Trailer Update: काऊंटडाउन सुरू; ‘या’ दिवशी येणार सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर
Naal 2 teaser
“मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा निरागस अंदाज अन् भारावून टाकणारी दृश्य, ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित
Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
Shivani Sonar will play the role of Sindhutai
Sindhutai Maazi Maai: लवकरच मोठी चिंधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?; ‘ही’ अभिनेत्री सिंधुताईंच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

“पुन्हा झिम्मा” असे गाण्याचे बोल आहेत. अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. या गाण्याला वैशाली सामंत, अपेक्षा दांडेकर, अमितराज यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘झिम्मा’मधील सगळीच गाणी सुपरहिट झाली होती. त्यामुळे आता ‘झिम्मा २’ मधील गाण्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhimma 2 new song punnha jhimma out now dpj

First published on: 20-11-2023 at 20:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×