हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. उद्या शुक्रवारी २४ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, आणि पोस्टरला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे दिसत नसल्याने काही चाहते नाराज झाले आहेत. मात्र आता त्या दोघी या चित्रपटात का नाही, याचे कारण समोर आलं आहे.

‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी हेमंत ढोमेला ‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले का नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिलं.

Chandrakant Kahire
“उद्धव ठाकरेंसाठी हे सगळं सहन करू”, राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज? म्हणाले, “माझा दोन वेळा…”
actress devoleena Bhattacharjee answer to payal malik comment
“माझा पती मुस्लिम असूनही प्रामाणिक…”, देवोलीना भट्टाचार्जीने पायल मलिकला दिलं प्रत्युत्तर, म्हणाली, “बहुपत्नीत्वासारख्या…”
Narendra Modi 'Hindu Card' Comment Video
नरेंद्र मोदींनी ‘हिंदुत्वाचे कार्ड’ राजकारणात खेळल्याची कबुली दिली? Video मध्ये म्हणाले, “हा निवडणुकीचा अजेंडा नाही तर.. “
Amir Khan
‘महाराज’ नाही, तर ‘लाल सिंह चड्ढा’तून होणार होते पदार्पण; पण आमिर खान…”, जुनैद खानने सांगितला ‘तो’ किस्सा
Virat Kohli thanks PM Modi for his encouraging words following India’s triumph in T20 World Cup
Team India : विराट कोहलीने पंतप्रधानांचे मानले आभार; म्हणाला, “आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुम्ही मला नेहमीच…”
loksatta analysis rebellion in shiromani akali dal leaders ask sukhbir badal to step down
विश्लेषण : अकाली दलात ‘अकाली’ बंड… पंजाबच्या राजकारणाला नवे वळण?
Jawaharlal Nehru Last Interview Viral Video Fact Check
“माझा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही”, जवाहरलाल नेहरू स्वतः शेवटच्या मुलाखतीत असं म्हणाले का? Fact Check Video पाहा
swara bhasker talks about sonakshi sinha and zaheer iqbal wedding
“सोनाक्षी-झहीरला मुलं झाल्यावर…”, आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं मत; म्हणाली, “आपल्या देशात…”

हेमंत ढोमे काय म्हणाला?

‘झिम्मा २’ या चित्रपटात सोनाली आणि मृण्मयी का नाही, यामागचं थेट कारण मी तुम्हाला सांगतो. सोनाली आणि मृण्मयी या पात्रांचं पुढे काय होणार याचा मी विचार करत होतो. दुसऱ्या भागाची कथा मी करत असताना सोनाली (मैथिली) च्या पात्राचे मला उगाचच ओढून ताणून काही करायचं नव्हतं. झिम्माच्या पहिल्या भागात त्याचा गोड शेवट आम्ही दाखवला होता. निखिल मैथिलीला मारहाण करतो, असं काही मला त्यात दाखवायचं नव्हतं. मला उगाचच हवा भरायची किंवा पाणी भरायचं असं काही त्या पात्रामध्ये करायचं नव्हतं.

तसेच रमा हे मृण्मयीचं जे पात्र आहे, त्यात ती पहिल्या भागात मूल होणार असं सांगत असते. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहिलात तर तुम्हालाही हे नक्की कळेल. त्याबरोबरच जर प्रेक्षकांनी ‘झिम्मा २’ वर भरभरुन प्रेम केलं आणि आम्ही जर तिसरा भाग बनवला तर त्या पुन्हा दिसतीलही, असे वक्तव्य करत हेमंत ढोमेने ‘झिम्मा ३’ या चित्रपटाचे संकेतही दिले.

दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे.