scorecardresearch

“आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट

अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट

“आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट
अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशी भावूक. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी जितेंद्रसाठी खास ट्वीट केलं होतं. याच ट्वीटचा फोटो शेअर करत जितेंद्रने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहिली आहे.

जितेंद्र जोशीला ‘थार’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या प्रकारात नामांकन मिळालं आहे. याबाबत अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन जितेंद्र जोशीचा चित्रपटातील फोटो शेअर करत मत देण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं होतं. जितेंद्रने याच ट्वीटचा फोटो शेअर करत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट लिहीली आहे.

हेही वाचा>> अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>> Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

“मी ट्वीटरवर नाही. पण कोणीतरी याचा फोटो मला शेअर केला आहे. अनिल कपूर सर यांना स्वत:ला नामांकन मिळालेलं आहे. पण तरीही ते मला मत देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. सर तुम्ही व तुमची निर्मिती कंपनी आमची फार उत्तमप्रकारे काळजी घेते. सगळेच कलाकार व चित्रपटाची टीम तुमच्याबरोबर काम करताना आनंदी होते. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रेरितही केलं आहे. लव्ह यू सर.” असं म्हणत जितेंद्रने अनिल कपूर यांचे आभार मानले आहेत.

हेही पाहा>>Photos: अर्जुन कपूरच्या बाळाची आई होण्याबाबत मलायका अरोरा स्पष्टच बोलली, म्हणाली “आम्ही याचा विचार…”

‘थार’ या चित्रपटात जितेंद्र जोशीने पन्ना ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड’मध्ये नामांकन मिळालं आहे. अनिल कपूर यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी नामांकन मिळालं आहे. त्यांनी जितेंद्र जोशीबरोबरच चित्रपटातील नामांकन मिळालेल्या इतर कलाकारांचे फोटोही ट्वीट करत मत देण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 14:13 IST

संबंधित बातम्या