केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र या अशा तिन्ही माध्यमांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच केदार शिंदेंबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. केदार शिंदे यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे.

वडिलांनी लहानपणी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा करणाऱ्या खुशबू सुंदर कोण आहेत?

kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या
minor girl kidnapped from chhattisgarh rape by railway head constable
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

केदार शिंदे यांच्या ऑफिशिअल अकाउंटवर त्यांच्या कोणत्याही पोस्ट दिसत नाहीत. त्यांच्या अकाउंटवर दोन फोटो दिसत आहेत. ते दोन्ही फोटो एका तरुण मुलाचे आहेत. या फोटोंवर केदार शिंदे यांचं अकाउंट हॅक झाल्याच्या कमेंट्स आहेत. त्यातला एक फोटो मास्क घातलेला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तरुणाचा चेहरा दिसत आहे.

‘सरांचं अकाउंट पुन्हा हॅक झालंय’, ‘या फोटोतल्या तरुणानेच केदार शिंदेंचं अकाउंट हॅक केलं असावं,’ अशा प्रकारच्या कमेंट्स या पोस्टवर आहेत.

दरम्यान, यापूर्वी डिसेंबर महिन्यातही केदार शिंदे यांचं अकाउंट हॅक झालं होतं. तेव्हा त्यांचं फेसबूक अकाउंट झालं होतं. केदार शिंदे यांनीच याबद्दल माहिती दिली होती. आता दोन-तीन महिन्यांच्या अंतराने पुन्हा त्यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालंय.