‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेते किरण माने घराघरांत लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर ते नेहमीच सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण मानेंनी या पोस्टमध्ये पैशांचं कितीही आमिष दाखवलं तरी काही विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांमध्ये कधीच काम करणार नाही असं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “चित्रपट सपशेल आपटला अन्…”, ‘त्या’ कठीण काळात अवधूत गुप्तेला कोणी दिली साथ? पहिल्यांदाच केला खुलासा

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांखाली छुपा मुस्लीमद्वेष पसरवणाऱ्या प्रोपोगंडा फिल्म्समध्ये मी काम करणार नाही. कितीही पैशांचं आमिष दाखवलं तरी. हा बाणा धर्मांध झुंडीच्या ट्रोलिंगचं नाक ठेचून पुरून उरतो भावा. करून बघ. जालीम उपाय आहे.” अशी पोस्ट किरण मानेंनी फेसबुकवर शेअर केली आहे.

हेही वाचा : गुलाबी साडी, पुणेरी थाट अन्…; ‘कन्यादान’ फेम अभिनेता झाला मुंबईचा जावई, अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न

किरण मानेंनी मांडलेल्या त्यांच्या मतावर सध्या नेटकरी व्यक्त होऊ लागले आहेत. “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो”, “बरोबर आहे सर योग्य निर्णय” अशा कमेंट्स काही युजर्सनी किरण मानेंनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते ‘तेरवं’ या चित्रपटात झळकले होते. तसेच याआधी त्यांनी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत भूमिका देखील साकारली होती.