Kishori Shahane Tujhya Rupan Ved Lavala Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या ‘तुझ्या रुपानं वेड लावलं’ या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलपासून अनेक इन्फ्लुएन्सर्सनी या गाण्यावर रील बनवले असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज आणि त्यांचा मुलगा बॉबी विज यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये किशोरी शहाणे लाल रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत असून, त्यांनी मुलासोबत या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे.
सोशल मीडियावर एखादं गाणं ट्रेंडिंग असलं की बरेच कलाकार त्यावर थिरकताना दिसतात. अनेकांना रील बनवण्याचा मोह आवरत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या ‘तुझ्या रुपानं वेड लावलं’ गाण्यावर गौतमी पाटीलसह बऱ्याच जणांनी रील बनवले आहेत. यापैकीच एका रीलची सध्या खूप चर्चा होत आहे. ते रील आहे ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज व त्यांचा मुलगा बॉबीचं.
बॉबी विज याने आईबरोबर ‘तुझ्या रुपानं वेड लावलं’ वर ठेका धरला. बॉबी व किशोरी यांनी या ट्रेंडिंग गाण्यावर अत्यंत सुंदर डान्स केला आहे. त्याने आईबरोबरच्या या सुंदर डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. माय-लेकाच्या या डान्स व्हिडीओचं चाहते व इतर कलाकारही खूप कौतुक करत आहेत.
लाल साडीत किशोरी शहाणे खूप सुंदर दिसत आहेत. ‘डान्स-जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा परतली आहे- वेड लावलं’, असं कॅप्शन बॉबीने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ किशोरी शहाणे त्यांच्या मुलाबरोबर तितक्याच एनर्जीने स्टेप्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
किशोरी शहाणे व बॉबी विज यांच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर जबरदस्त, या वयात पण एवढी एनर्जी खूपच छान, झकास, माय-लेक लय भारी, सुंदर डान्स, खूप सुंदर, एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स, अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
काय करतो बॉबी विज?
बॉबीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर म्हणून जाहिरातीत काम केलं. एडिटिंग रूममध्येसुद्धा असिस्टंट म्हणून काम केलं आहे. कास्टिंगदेखील केलं आहे. साऊंड रेकॉर्डिंग रुम, डबिंग स्टुडिओ अशा सगळ्यात मी असिस्टंट म्हणून काम केल्याचं बॉबी विज याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
