अभिनेत्री किशोरी शहाणे लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट, हिंदी मालिका, बिग बॉस मराठी अशा सर्व माध्यमातून अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

नुकतीच किशोरी शहाणे मुलगा बॉबीसह ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींबाबत चर्चा केल्या. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला कधी सुरुवात केली. तसेच बॉबीचे बालपण, आई-वडिलांच्या स्टरडमचा त्याच्यावर काही परिणाम झाला का, अशा अनेक बाबींबाबत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच बॉबी सध्या काय करतो, त्याचे शिक्षण काय झाले आहे, याचादेखील त्याने खुलासा केला. जाणून घेऊयात किशोरी शहाणे यांच्या मुलाचे शिक्षण किती झाले आहे.

किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी विजचे शिक्षण किती?

किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी वीज म्हणाला, “मला सुरुवातीपासून सेटवर जायचो. तर मला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, असा विचार माझ्या डोक्यात होता. शिर्डी साईबाबा हा मी पहिला सिनेमा केला. त्यानंतर अभिनयातील माझी रुची वाढली. शाळेत असताना मी डान्स, नाटकांत काम करत होतो. बालकलाकार म्हणून मी काम केले आहे. शाळेच्या स्नेह संमेलनातील नाटकात मी भाग घेत असे.

मला अभिनयात आवड होतीच. पण, मी विचार केला की शिक्षणसुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर बघूया. माझं मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि कॅम्पस प्लेसमेंट झालं. त्यावेळी मी थोडा गोंधळात पडलो. मला क्रिएटीव्ह क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. त्यामुळे अभिनयात करिअर करण्याचा मी निर्णय घेतला. त्यानंतर मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून जाहिरातीत काम केले आहे. एडिंटिंग रूम मध्येसुद्धा असिस्टंट म्हणून काम केलं आहे. कास्टिंगदेखील केले आहे. साऊंड रेकॉर्डिंग रुम, डबिंग स्टुडिओ अशा सगळ्यात मी असिस्टंट म्हणून काम केले आहे.

पुढे बॉबी म्हणाला की मी लहानपणापासून थिएटर करतोय. आजही मी थिएटर करतो. तसेच, कलर्स, झी वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यात देखील काम केलं आहे. खूप वर्कशॉप केलं. डान्सर म्हणून मी कोरिओग्राफीचा सराव करत होतो. मार्शल आर्ट्सदेखील केला. कोणतीही भूमिका येऊ शकते. त्या दृष्टीने मी सगळी तयारी केली. त्यानंतर मी थिएटर केलं. सध्या माझ्या हातात काही प्रोजेक्ट्स आहेत.”

दरम्यान, आता बॉबी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.