Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध, आंदोलनं होतं आहेत. याप्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कलाक्षेत्रातून घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. बॉलीवूड कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत प्रत्येक जण या घटनेविषयी संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ( Kshitija Ghosalkar ) कवितेच्या माध्यमातून कोलकाता बलात्कार प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं आहे.

क्षितीजाने लिहिलेली कविता वाचा…

“आईनेही रक्त सांडलं माझ्या जन्माच्या वेळी, मी ही पाहिलं वयात आल्यावर जेव्हा आली मासिक पाळी, फस्ट सेक्स तेव्हाही रक्तचं आणि रेप तेव्हा तर रक्तचं रक्त, ब्लेडने पाठीवर वार केलेले ओरखडे किती? डोळ्यांसमोर भीषण चेहरे आणि एक अनामिक भीती, प्रत्येक वेळेला का द्यावी लागते मला आहुती रक्ताची आणि भयला साथ आहे डोळ्यातील अश्रूंची, रेपसाठी नव्हती कारणीभूत माझ्या कपड्यांची साइज, जरा वाढवा तुमच्या विचाऱ्यांच्या कक्षा इफ युआर वाइज, मी साडी नेसून फिरले तरी तोडले जातात ना लचके माझ्या शरीराचे, मग उद्या बिकनी घालून फिरले तर शिकवून नका धडे संस्कृती आणि संवर्धनाचे, माझ्यावर वेळेची बंधन घालण्यापेक्षा तुम्ही मर्यादाची बंधनं पाळणं जास्त गरजेचं आहे, कारण माझ्या क्लीवेजपेक्षा जास्त खोल तुमच्या विकृतीची नजर आहे, तिच्या मनावर उमटलेल्या ओरखडची वाघनख उडाली, तिच्या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त येण्याआधी ‘ती’साठी लढूया, स्त्री हे देवीचं रुप, तेही शक्तीचं, अत्याचाराच्या रक्ताचा टीळा माथ्यावर लावून ‘ती’ला न्याय मिळवून देऊ या,” अशी कविता क्षितीजाचा घोसाळकरने ( Kshitija Ghosalkar ) लिहिली आहे.

Badlapur Crime, Kolkata Doctor Rape Case poster goes viral
VIDEO: “स्वत:च्या बहिणीसाठी वाघ अन् दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला…” तरुणानं भर चौकात झळकवलेली पाटी पाहाच
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
girl dance on gulabi sari
‘गुलाबी साडी’, गाण्यावर परदेशी चिमुकलीचा भन्नाट डान्स; एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरी करतायत कौतुक
kareena kapoor praises shahid kapoor
ब्रेकअपनंतर तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदाच करीना कपूरने मानले शाहिद कपूरचे आभार; म्हणाली, “त्याच्याशिवाय…”
Bigg Boss Marathi 5
Video: रितेश देशमुखचे ‘ते’ सरप्राइज आणि स्पर्धक झाले भावुक, भाऊच्या धक्क्याचा नवीन प्रोमो पाहिलात का?
Arbaz Patel reacts on engagement claim by nikki tamboli mother
Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया
badlapur child girl abused case
Badlapur School Case: “…तर असे प्रकार घडणार नाहीत”, बदलापूर प्रकरणावर विधानपरिषद उपसभापतींनी मांडली महत्त्वाची भूमिका!
badlapur School case two girls sexually abuse
रक्त खवळतंय, हँग द रेपिस्ट; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप, पोस्ट चर्चेत

हेही वाचा – Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप, “त्याने शॉर्ट स्कर्टमध्ये मला…”

क्षितीजाच्या ( Kshitija Ghosalkar ) या कवितेच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्रत्येक मुलीला आता उभं राहून असल्या नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे”, “कितीही कठोर शिक्षा दिली तरी कमी पडेल”, “ताई मी पण एक मुलगा पण मी म्हणतो की मारून टाका त्या कुत्र्यांना”, अशा अनेक प्रतिक्रिया क्षितीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “मालवणी भाषा माका कळता…”, म्हणत रितेश देशमुखने घेतला वैभवचा समाचार! रांगड्या गडीने हात जोडून मागितली माफी

दरम्यान, याआधी कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, आर्या आंबेकर, सौरभ गोखले अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या क्षितीजाचा ( Kshitija Ghosalkar ) कवितेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.