अभिनेत्री क्रांती रेडकरनं तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यानं मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. एवढंच नाही तर तिनं दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ही सर्वगुण संपन्न असलेली अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. नुकताच क्रांतीनं मुलींचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी; मृण्मयी देशपांडे, शरद पोंक्षेंसह ‘हे’ कलाकार झळकणार

क्रांती रेडकरनं मुलींचा नवा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “१० दिवसांत लहान मुलांची आपल्या लाडक्या गणूशी मैत्री होते हेच खरं. छबिलनं आमच्याकडे गणू फॅमिली बनवली आहे.” या व्हिडीओत क्रांतीची छबिल नावाची मुलगी नवीन नाव सांगताना पाहायला मिळत आहे. यावेळी ती म्हणते की, “माझं नवीन नाव गणपती, गोदूचं नाव कार्तिक आणि माझ्या बाबांचं नवीन नाव शंकर भगवान आहे.” क्रांतीच्या मुलींचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: “आलिया, परिणीतीपेक्षाही छान…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

काही तासांपूर्वी क्रांतीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया उमटत आहे. “किती गोड”, “नवीन नाव आम्हाला आवडली”, “आजपासून तुम्ही पार्वती बाई”, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

हेही वाचा – “कुणी बोलायचं नाही” मराठमोळ्या संगीतकाराच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला, “दारू पिऊन वर्षभरातील सर्व भावना…”

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहे. तसेच क्रांतीनं दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी क्रांतीनं ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

Story img Loader