Kranti Redkar Emotional Video: क्रांती रेडकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिला आलेले अनुभव शेअर करत असते. पण, ती तिच्या अनोख्या स्टाईलने ती गोष्ट सांगते. त्यामुळे तिच्या अशा व्हिडीओंचा चाहतावर्ग मोठा आहे.

अनेकदा ती तिच्या छोट्या मुलांच्या शाळेत काय घडलं, त्या कोणत्या गोष्टीवर कशा प्रतिक्रिया देतात याबरोबरच तिचे आई-वडिलांबरोबरचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील तिने शेअर केलेल्या अशा व्हिडीओंचा मोठा चाहतावर्ग आहे.

आता मात्र क्रांतीने शेअर केलेला एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. तिने तिच्या आईचे काही फोटो, विविध व्हिडीओ शेअर केले आहेत. नातवंडांबरोबरच्या गप्पा, वाढदिवस असे अनेक खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

Award Banner

क्रांतीच्या आईबरोबर ती, तिच्या दोन मुली, तिचे वडील, तसेच तिचे पती या सगळ्यांची झलकदेखील पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी तिच्या लहानपणीचा आईबरोबरचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. शेवटी आईच्या तरुणपणीचा एक फोटो पाहायला मिळतो.

“…ती आहे म्हणून आम्ही आहोत”

तिघी हा सिनेमा आज (६ मार्च २०२६) प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आईबद्दल तिने लिहिले, “माझी वन मॅन आर्मी आहे. ती आहे म्हणून आम्ही आहोत.”

तिघी या सिनेमाबद्दल तिने लिहिले, “तिघी हा सिनेमा आज प्रदर्शित होतोय. आपण ज्या सुंदर, अर्थपूर्ण चित्रपटांची वाट बघत असतो, तसाच हा चित्रपट आहे.”

पुढे तिने सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसेला टॅग करत लिहिले, “मला आशा आहे की, माझ्या मैत्रिणी सोनाली आणि नेहाच्या परफॉर्मन्सलाबॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळू दे. प्रेक्षकांना त्यांचा हा सिनेमा आवडावा”, अशी आशा क्रांतीने व्यक्त केली.

भारती आचरेकर यांच्याबद्दल तिने लिहिले, “खूप चांगला स्वभाव असलेली माझी अत्यंत आवडती व्यक्ती आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिचा परफॉर्मन्स पाहणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.” शेवटी तिने तिघी या सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

नेटकरी झाले भावुक

क्रांतीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आणि देवबाप्पांनी दिलेलं वरदान म्हणजे आपल्याला जन्म देणारी आई आणि आपल्या पोटी जन्म घेतलेली मुलगी. जगण्याचा अमूल्य ठेवा म्हणजे ही नाती आहेत. कशाला रडवतेस गं? माझं माहेर दूर आहे आणि मुलगीपण जवळ नाही”, “तुझी आई किती सुंदर दिसते”, “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी”, “तुझ्या आईला बघून मला माझ्या आईची आठवण झाली”, “आईशिवाय घराला घरपण नाही”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, तिघी या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी व नेहा पेंडसे प्रमुख भूमिकांत आहेत. आता या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.