Premium

Video : “आमच्या घरी गणपती बसत नाही पण…”, क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पाची ओढ; नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींनी बाप्पासाठी गायली खास आरती, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

kranti redkar daughters video
क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पासाठी गायली आरती

क्रांती रेडकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. क्रांतीने २०१७ मध्ये सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. हे जोडपं कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. क्रांती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती इन्स्टाग्रामवर नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “‘खुपते तिथे गुप्ते’ का बंद करताय?”, चाहत्याच्या प्रश्नाला अवधूत गुप्तेने दिलं उत्तर, म्हणाला…

क्रांतीला झिया आणि झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. आपल्या दोन्ही मुलींना अभिनेत्री छबिल आणि गोदो अशी हाक मारते. लहानपणापासूनच क्रांतीने दोन्ही मुलींना मराठी संस्कृती आणि सणांविषयी बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. परंतु, क्रांतीच्या घरी गणपती बाप्पा बसत नाही. अभिनेत्रीच्या दोन्ही जुळ्या मुली घरी कायमस्वरूपी असलेल्या बाप्पाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करतात. याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ

क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला छबिल आणि गोदो हॅप्पी बर्थडे…हे गाणं बोलून बाप्पाला शुभेच्छा देतात. त्यानंतर “जय देव जय देव जय मंगलमूर्ती…” ही आरती गाऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये क्रांती लिहिते, “आमच्या घरी गणपती बसत नाही पण, लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच असते. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या शूट दरम्यान ही बाप्पाची मूर्ती मला नेहा पाटीलने भेट म्हणून दिली होती. आता हा बाप्पा आमच्या छबिल गोदोचा खास मित्र झाला आहे. त्या दोघींच्या आयुष्यातील तो एक अविभाज्य घटक आहे. गणपती बाप्पा मोरया!! तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री यंदा न्यूझीलंडमध्ये साजरा करतेय गणेशोत्सव; खास थीमचे फोटो शेअर करत म्हणाली, “सलग २ दिवस…”

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “तुझ्या दोन्ही मुली किती गोड आहेत.”, “गोड मैत्री…”, “या दोघींना नक्कीच बाप्पा पावणार”, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kranti redkar shared cute video of her twin daughters on the occasion of ganesh chaturthi sva 00

First published on: 19-09-2023 at 11:31 IST
Next Story
“हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष