Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Collection : ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ अशा गाजलेल्या सिनेमांनंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे यंदाच्या वर्षी त्यांचा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ज्याचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’.

गेल्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसतेय. हेमंत ढोमेच्या या बहुचर्चित आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच सिनेमाचं आठवडाभराचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

हेमंत ढोमेनं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातून मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचं मत व्यक्त केलं आहे. या विषयानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सर्वत्र सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमानं आठवडाभरात पाच कोटींचा गल्ला पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटानं ६.१४ कोटी कमावले आहेत.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ आठवड्याभराचं कलेक्शन

Sacnilk नुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या नऊ दिवसांत भारतात अंदाजे ६.३७ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ०.७ कोटी, दुसऱ्या दिवशी ०.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी १.०५ कोटी, चौथ्या दिवशी १.५ कोटी कमावले, तर पाचव्या, सहाव्या व सातव्या दिवशी अनुक्रमे ०.५ कोटी कमावले आहेत आणि आठव्या दिवशी ०.५५ कोटींची कमाई केली आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चं नवव्या दिवशीचं कलेक्शन ५.७५ कोटी आहे; तर दहाव्या दिवशी सिनेमानं अंदाजानुसार ०.६० कोटी कमावले आहेत. अशा प्रकारे सिनेमाचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ६.३५ कोटी इतकं झालं आहे. त्यात शनिवार आणि रविवारी सिनेमाच्या कमाईत आणखी भरही पडू शकते.

दरम्यान, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मुळे नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी आश्वासक ठरली आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांत सिनेमाला हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. त्यामुळे या वर्षीची मराठी सिनेमाची सुरुवात दणक्यात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सिनेमामधील कलाकार

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सिनेमात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षिती जोग, निर्मिती सावंत व प्राजक्ता कोळी हे मुख्य भूमिकांत आहेत. १ जानेवारी रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.