Premium

क्रिती सेनॉनने पाहिला रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट; पोस्ट करत म्हणाली, “मला उशीर झाला, पण…”

‘वेड’ पाहिल्यानंतर क्रिती सेनॉनची रितेश देशमुख व जिनिलीयासाठी खास पोस्ट, वाचा सविस्तर

kriti sanon on ved
क्रिती सेनॉन, वेड चित्रपट

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली व अनेक अवॉर्डही जिंकले. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने जवळपास पाच महिन्यांनी हा चित्रपट पाहिला व त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेड चित्रपटातील एक फोटो स्टोरीला शेअर करत क्रितीने लिहिलं, “चित्रपट पाहण्यास मला खूप उशीर झाला. पण मला ‘वेड’ चित्रपट खूप आवडला. मित्रा, रितेश हा चित्रपट तू उत्तम दिग्दर्शित केला आहेस. अभिनय, चित्रपटातील दृश्ये सर्वच उत्तम आहे. तू आणि जिनिलीया प्रेम आहात. असंच काम करत राहा.”

क्रिती सेनॉनची स्टोरी

क्रितीची ही पोस्ट स्टोरीवर रिपोस्ट करत जिनिलीयाने आभार मानले आहेत. दरम्यान, रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटाने ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जवळपास महिनाभर हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता.

दुसरीकडे क्रितीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने सीतेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार असून सध्या कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये प्रभास, सैफ अली खान यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 15:05 IST
Next Story
“मला वाटतं की…”, ‘झुंड’ चित्रपटाच्या अपयशाबाबत नागराज मंजुळेंचं वक्तव्य; ‘घर बंदुक बिर्याणी’च्या ओटीटी रिलीजबद्दलही दिली माहिती