दमदार अभिनयाबरोबरच आपल्या लेखणीने अन् दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे प्रवीण तरडे. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, असे दर्जेदार चित्रपट त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. तसंच मराठीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवीण तरडेंनी आपली छाप उमटवली आहे. अशा या हरहुन्नरी कलावंताचा सोमवारी ( ११ नोव्हेंबर ) ५०वा वाढदिवस होता. यानिमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रवीण तरडेंना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट लिहिल्या. तसंच अभिनेता कुशल बद्रिकेनेदेखील खास ५० कविता लिहिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“प्रवीण तरडे यांच्या गोल्डन जुबलीला जाता न आल्याबद्दलचा हा जाहीर माफीनामा…वाढदिवसाच्या शुभेच्छा यार,” असं कॅप्शन लिहित कुशल बद्रिकेने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशलसह लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने देखील आहेत. दोघं मजेशीर अंदाजात प्रवीण तरडेंना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Video: “आय लव्ह यू सूर्या…” म्हणत तुळजाने सूर्यादादाला ‘असं’ केलं प्रपोज, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’चा जबरदस्त प्रोमो

या व्हिडीओत सुरुवातीला विजू माने म्हणतात, “प्रवीण मित्रा आज तुझा ५०वा वाढदिवस. तू इतक्या प्रेमाने, इतक्या वेळा बोलावलं होतंस, जवळपास ५० वेळा तू आमंत्रण दिलंस. आम्ही निघालो होतो. पण काही कारणाने आम्हाला यायला जमतं नाहीये. मला तुला ५०व्या वाढदिवसानिमित्ताने विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत.” तितक्यात कुशल बद्रिके कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. कुशल म्हणतो, “मुळशी पॅटर्नचा तू डिरेक्टर, पांडूमधला अ‍ॅक्टर, तुझा पिक्चर धर्मवीर …तुझा पिक्चर धर्मवीर टू…हॅप्पी बर्थडे यू टू.”

हेही वाचा – “तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…

कुशलची ही कविता ऐकून विजू माने हैराण होतात. ते म्हणतात, “प्रवीण खरंतर मी तुझ्या ५०व्या वाढदिवसानिमित्ताने तुझं चित्र गिफ्ट देणार होतो. ते विशेष होतं. पण याने हे काय सुरू केलं कोणास ठाऊक.” तेव्हा कुशल विजू मानेंना म्हणतो, “५० कविता येत नाही?” विजू माने म्हणतात की, कशाबद्दल? तेव्हा कुशल म्हणतो, “दादाला ५० वर्ष झाली ना.” तेव्हा विजू माने म्हणतात की, ५० कविता असल्या… त्यानंतर विजू माने उठून निघून जातात. कुशल बद्रिके आणि विजू मानेंचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं डिनरसाठी, अभिनेत्रीने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

या व्हिडीओच्या शेवटी प्रवीण तरडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मजेशीर फोटो तयार केलेला आहे. कुशल बद्रिके आणि विजू मानेंच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच जणांनी हसण्याचे इमोजी प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिले आहेत.

Story img Loader