Love Lagna Locha : प्रत्येकाला लग्न करताना आपल्या मनासारखा जोडीदार हवा असतो. प्रेम, मैत्री, विश्वास या गोष्टींना नात्यात खूप जास्त महत्त्व असतं. अशाच आगळ्या वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘Love लग्न लोचा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘Love लग्न लोचा’ चित्रपटात प्रमुख भूमिका चेतन चिटणीस आणि आदिती पोहनकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. याशिवाय चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. जुई पवार, अविनाश नारकर, वंदना वाकनीस, जयवंत वाडकर, अमोल नाईक असे बरेच कलाकार यामध्ये एकत्र झळकणार आहेत. ‘Love लग्न लोचा’ मध्ये प्रेक्षकांना रोमँटिक कॉमेडीची अनुभूती घेता येईल. प्रेम, मैत्री आणि विश्वास याची परिभाषा प्रेक्षकांना यामध्ये पाहता येईल.

avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा : रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

‘Love लग्न लोचा’ हा चित्रपट सर्वांसाठी सांगितिक पर्वणी ठरेल. चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेने जबाबदारी सांभाळली आहे. शाल्मली खोलगडे, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, वैशाली माडे अशा लोकप्रिय गायकांनी यामध्ये गाणी गायली आहेत.

दिग्दर्शक सिनेमाबद्दल सांगतात, “आधुनिक काळातील जोडप्याची ही कथा आहे. हे जोडपं घरातून पळून जातं, दोघांमध्ये होणारे वाद यानंतर पार पडणाऱ्या सामुदायिक विवाहसोहळ्यात काय गंमत घडणार हे तुम्हाला प्रत्यक्ष चित्रपटात पाहायला मिळणार आहे.”

‘Love लग्न लोचा’ या चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. याच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरात शहरात १०० जोड्यांची लग्न लावण्यात आली होती. हा लग्न सोहळा खूप सुंदर आणि दिमाखदार दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचा नायक अधिराज (चेतन चिटणीस) चित्रपटाची नायिका अनन्या (आदिती पोहनकर) हिच्याशी लग्न करण्यासाठी याच सामुदायिक विवाह सोहळ्याचा भाग होतो. पण जर १०० जोडप्यांच्या गडबडीत, काही गडबड झाली तर, तर मग काय घडणार? या विषयावर हा चित्रपट आधारलेला आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

Love Lagna Locha
Love Lagna Locha

‘लव्ह, लग्न, लोचा’ या चित्रपटाची निर्मिती प्रांजली मोशन पिक्चर्सने केली असून संदेश कानडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. संकेत बहिरीनाथ आवळे, सागर प्रमोद गांवकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूर, मुंबई, फिल्मसिटी गोरेगाव अशा ठिकाणी झालेलं आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी लवकरच ‘Love लग्न लोचा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader