मराठी रसिक प्रेक्षक सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील बरेच कलाकार येणाऱ्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार नाहीयेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मधुराणी प्रभुलकरने ( Madhurani Prabhulkar ) विजेची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. पण असं असलं तरी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात मधुराणी प्रभुलकर झळकणार नाहीये. अशातच तिने ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाशी संबंधित काही किस्से सांगितले आहेत.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ( Madhurani Prabhulkar ) ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासंबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला. मधुराणी म्हणाली, “मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा अनेक स्वप्न उराशी घेऊन आले होते. त्यावेळी मी एक मालिका केली. त्यानंतर मला लगेच ‘नवरा माझा नवसाचा’सारखा चित्रपट मिळाला. मी सचिन पिळगांवकर सरांकडे स्वतः गेले होते. त्यानंतर मला विजे ही भूमिका मिळाली. त्या भूमिकेसाठी मी जे इंग्रजी बोलले आहे. अगदी तसंच माझ्या बहिणीची मुलगी बोलायची. तेच कुठेतरी माझ्या भूमिकेसाठी वापरावं असं मला वाटलं. पहिल्याच दिवशी मी जेव्हा सीन दिला तो सचिन सरांना खूप आवडलं. संपूर्ण चित्रपटात मी तिच भाषा बोलली आहे. तसंच माइक म्हणून मी जो हेअरब्रेश वापरला होता तो मी स्वतः दादरला जाऊन माझ्या हातात मावेल असा घेतला होता.”

Prashant Damle reaction on Vijay Kadam Death
विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
riteish deshmukh reacts on jahnavi killekar Varsha Usgaonkar fight
Video: वर्षा उसगांवकरांना “हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका,” म्हणणाऱ्या जान्हवीला रितेश देशमुखने सुनावलं; म्हणाला, “जितके प्रोजेक्ट्स…”
Navra Maza Navsacha movie quiz
Quiz : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं
Sai Tamhankar News
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचं ब्रेक अप? ‘या’ स्टेटसमुळे रंगली चर्चा
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
navra maza navsacha 2 first poster
नवरा माझा नवसाचा २ : सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित! सचिन पिळगांवकर म्हणाले, “गणपतीपुळ्याचे प्रवासी कन्फर्म…”
Actor Kirna Mane Post on Kolkata
Kiran Mane Post About Kolkata Murder : “कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींचा मोर्चा म्हणजे ढोंग, तुम्ही..”; किरण मानेंची पोस्ट

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मिहिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाली, “तू अल्लड आणि निर्मळ…”

Madhurani Prabhulkar (Photo Credit- Star Pravah)

इंडस्ट्रीमध्ये येताच माझ्या पुढ्यात पंचपक्वांचं ताट – मधुराणी प्रभुलकर

पुढे मधुराणी ( Madhurani Prabhulkar ) म्हणाली, “अशोक मामांच्या बाजूला बसून काम करणं म्हणजे मला फारचं दडपण आलं होतं. लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहत असताना त्यांच्याबरोबर काम करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. एवढे मोठे कलाकार असून सुद्धा त्यांनी मला सांभाळून घेतलं. ज्यावेळी रिमा ताईंची एन्ट्री झाली तेव्हा मी त्यांच्याकडे बघतचं बसले किंवा सोनू निगम असेल. यांसारख्या मोठ्या कलाकरांबरोबर काम करणं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये येताच माझ्या पुढ्यात पंचपक्वांचं ताट वाढल्यासारख झालं होतं.”

हेही वाचा – नवरा माझा नवसाचा २ : सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित! सचिन पिळगांवकर म्हणाले, “गणपतीपुळ्याचे प्रवासी कन्फर्म…”

“सुप्रिया ताई, सचिन सर खूप सपोर्टिव्ह आहेत. ही भूमिका मला खूप काही देऊन गेली आहे. ज्यावेळी ‘आई कुठे काय करते’ मालिका आली तेव्हा मीच ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील विजे आहे हे लगेच ओळखलं होतं. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये मी नाहीये. पण यानिमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या,” असं मधुराणी प्रभुलकर ( Madhurani Prabhulkar ) म्हणाली.