‘आयफा – २०२३’ हा पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला दिसला. याचं कारण म्हणजे रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता नुकतीच रितेशने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्टवर माधुरी दीक्षितने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

‘वेड’ हा चित्रपट गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकलं, तर त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाने चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी केली. याच कामगिरीबद्दल यंदाच्या ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात या चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

‘वेड’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाल्यावर रितेशने सोशल मीडियावर हा पुरस्कार स्वीकारतानाचा त्याचा आणि जेनिलियाचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करीत त्याने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. रितेशच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या मित्रमंडळींनीही कमेंट्स करीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर रितेशच्या या पोस्टवर धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही कमेंट केली. तिने लिहिलं, “अभिनंदन…!” आणि याचबरोबर तिने सेलिब्रेशनचा आणि रेड हार्ट इमोजी वापरला. तर आता तिची ही कमेंट चर्चेत आली आहे.

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी रितेश- जेनिलियाचा ‘वेड’ प्रदर्शित झाला तेव्हाही तिने तिचा एक व्हिडीओ पोस्ट करीत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या.