Premium

Video : माधुरी दीक्षितला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, केदार शिंदे कमेंट करत म्हणाले…

‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

madhuri-dixit-baharla-ha-madhumaas
'बहरला हा मधुमास' गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ५६व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते. अभिनय कौशल्याने बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवणाऱ्या डान्सिंग क्वीनला मराठी गाण्याची भुरळ पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरी दीक्षितने ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन माधुरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित लाल रंगाची साडी नेसून बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या हुक स्टेप्स तिने केल्या आहेत. माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> दत्तू मोरेच्या लग्नाला होता सासऱ्यांचा विरोध, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “पळून जाणं..”

‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील माधुरी दीक्षितचा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमेंट केली आहे. “मनापासून धन्यवाद. माझ्या “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटातलं हे गाणं आहे. तुम्ही ते सादर केलं याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. नक्की पाहा एका मराठी थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र,” असं केदार शिंदेंनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “माझे वडील कसे दिसायचे हेही माहीत नाही”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं भाष्य, म्हणाला, “मी एक वर्षाचा असताना…”

रीलवर ट्रेंडिंग असलेलं ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून अंकुश चौधरी व सना शिंदे या सिनेमांत मुख्य भूमिकेत आहेत. २८ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. २ जूनला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhuri dixit dance on baharla ha madhumaas song kedar shinde commented on video kak