scorecardresearch

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर रितेश दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे.

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्षित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसाच उत्तम प्रतिसाद आता या चित्रपटाच्या गाण्यांना मिळताना दिसत आहे. त्यांचे चाहतेच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांना या चित्रपटाच्या गाण्यांनी वेड लावलं आहे.

‘वेड’ या चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं आज प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसत आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिलाही या गाण्याने भुरळ घातली आहे.

आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…

माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या गाण्याचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “जेव्हा आपल्या प्रतिबिंबात कोणीतरी आपलं दिसतं तेव्हा वेडेपणातलं ‘सुख कळतं.’” यासोबतच तिने या गाण्याची लिंक ही शेअर केली आणि रितेश जिनिलीयाला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : “तुम्ही माझ्यासोबत असलात की…” जिनिलीयाने भर कार्यक्रमात लाजत घेतला रितेश देशमुखसाठी खास मराठमोळा उखाणा

रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर रितेश दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश- जिनिलीया ही जोडी मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 18:50 IST

संबंधित बातम्या