Premium

‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रसाद ओक, गौरव मोरे झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Mahaparinirvaan movie first look
‘महापरिनिर्वाण’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला. प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे. माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो. पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय, असा डायलॉगही यावेळी ऐकायला मिळत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक श्री नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारत आहे.
आणखी वाचा : अक्षरा-अधिपतीमध्ये प्रेम कधी खुलणार? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेबद्दल शिवानी रांगोळेने स्वत: केला खुलासा

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेला, दलितांच्या हक्कांसाठी लढलेला, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखों लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे.

‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातील अनेकांनी अंगावर काटा उभा राहिल्याचे म्हटलं आहे. ‘महापरिनिर्वाण या चित्रपटात अभिनेता गौरव मोरेही झळकणार आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.

आणखी वाचा : “मज्जाच गेली…”, नम्रता संभेरावची नाटकातून एक्झिट अन् नेटकरी झाले नाराज, विशाखा सुभेदार म्हणाली, “आधीच…”

या चित्रपटात प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम हे कलाकार झळकणार आहेत. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स व अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके आणि सहनिर्माते आशिष ढोले आहेत. संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर यांचे या चित्रपटाला गीत लाभले आहे. अमर कांबळे यांनी ‘महापरिनिर्वाण’चे छायाचित्रीकरण केले आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahaparinirvaan maathi upcoming movie first look relese prasad oak gaurav more starrer nrp

First published on: 06-12-2023 at 13:01 IST
Next Story
“मज्जाच गेली…”, नम्रता संभेरावची नाटकातून एक्झिट अन् नेटकरी झाले नाराज, विशाखा सुभेदार म्हणाली, “आधीच…”