Priyadarshini Indalkar Talks About Future Husband : प्रियदर्शिनी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून. प्रियदर्शिनीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते. प्रियदर्शिनी मुलाखतींमधूनही अनेकदा तिच्या व्यावसायिक व खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. अशातच आता तिने तिच्या ब्रेकअपबद्दल आणि तिला किती पगार असलेल्या मुलाशी लग्न करायचं आहे याबद्दल सांगितलं आहे. ‘बिग बॉस १९’फेम प्रणित मोरेच्या शोमध्ये तिने याबद्दल सांगितलं आहे. प्रियदर्शिनी नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
प्रियदर्शिनीला हवाय ‘इतके’ लाख कमावणारा मुलगा
प्रियदर्शिनीला तुला इन्स्टाग्रामवर मुलं लग्नासाठी मागणी घालतात का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो, मला मेलवर मागणी घालतात. ३-४ वर्षांपूर्वी एका माणसाने मला त्याचा अख्खा बायोडेटा पाठवला आणि तो ३५ वर्षांचा होता तेव्हा. माझं वय फक्त २४-२५ होतं. त्याने मला माझं घर इथे आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर आपण इथे राहू, इथे लग्न करू वगैरे सगळं सविस्तर सांगितलं.”
प्रियदर्शिनी पुढे म्हणाली, “काय नोकरी करतो, कुठे गुंतवणूक आहे सगळं सांगितलेलं.” पुढे तिला किती पगार होता त्याला असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “काहीतरी ४०-५० हजारांची नोकरी होती त्या माणसाला.” म्हणून तू त्याला सोडलंस ना असं विचारल्यानंतर प्रियदर्शिनी म्हणाली, “हो खरंतर.” यानंतर तिला किती पगार असता तर हो म्हणाली असती असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “महिन्याला ३५ लाख वगैरे कमावणारा हवा.”
दरम्यान, ब्रेकअपबद्दल प्रियदर्शिनीने सांगितलं की त्याला लग्न करायचं होतं लवकर, कारण तो माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठा होता आणि मला काही घाई नव्हती, त्यामुळे आमच्यामध्ये वाद झाले आणि पुढे ते नातं टिकलं नाही.”

