Shivali Parab Movie Mangla Poster Released: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. याच शोमध्ये आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कल्याणची चुलबुली शिवाली परब आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. आजवर प्रेक्षकांनी तिला विनोदी भूमिका साकारताना पाहिलं, पण आता ती एका गंभीर विषयावरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

शिवाली परब ‘मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या चित्रपटातील पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘मंगला’ असं या चित्रपटाचं नाव आहे. सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या ‘मंगला’ या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले असून मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – राजेश खन्नाऐवजी अमिताभ बच्चन यांना पसंती का दिली? जावेद अख्तर यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “खुशामत करणारे…”

या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत.एक कौलारू घर आणि कोपऱ्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे. मंगला नावाच्या एका गायिकेवर सूडाच्या भावनेतून अॅसिड हल्ला झाला होता, कठीण परिस्थितीशी तिने कशी झुंज दिली होती, ते या चित्रपटात पाहायला मिळेल. त्या काळी अॅसिड हल्ल्यासंबंधित कोणताही कायदा नव्हता, त्यामुळे योग्य तो न्याय न मिळाल्याने मंगलाने या परिस्थितीचा सामना कसा केला हे पाहणं रंजक ठरेल.

हेही वाचा – एकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तर काहींनी गाजवलं बॉक्स ऑफिस; तुम्ही पाहिलेत का हे सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट?

चित्रपटाचे पोस्टर

मंगला चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.