Gaurav More Married to Priyanka Karekar: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणजेच अभिनेता गौरव मोरे अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गौरवच्या लग्नाची बातमी अचानक समोर आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गौरवने स्वतः अद्याप कोणतीही अधिकृत पोस्ट केली नसली, तरी त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतजा बागवे हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर गौरव आणि त्याची पत्नी प्रियांका कारेकर यांचा फोटो शेअर करून या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.

अभिनेता गौरव मोरेने त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे. गौरव मोरेच्या लग्नाची बातमी अचानक आल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. खरं तर गौरवने अद्याप त्याच्या लग्नाची पोस्ट केलेली नाही. पण मराठी अभिनेत्री ऋुतजा बागवे हिने एक स्टोरी शेअर केली आहे. यामधील तिच्या कॅप्शनवरून गौरव मोरेचं लग्न झालंय हे स्पष्ट होतंय.

ऋतुजा बागवेने इन्स्टाग्रामवर गौरव मोरे व त्याची पत्नी प्रियांका कारेकरबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गौरवच्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय. हाताला मेहंदी लावली असून तिने हिरवा चुडा घातला आहे. ऋतुजाने ‘मिस्टर अँड मिसेस मोरे,’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Award Banner

ऋतुजा बागवेची पोस्ट

“मिस्टर अँड मिसेस मोरे तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला आयुष्यभर प्रेम, आनंद आणि सुख लाभो, हीच सदिच्छा,” असं ऋतुजा बागवेने या पोस्टवर लिहिलं आहे. ‘करू आणि बच्ची गॉड ब्लेस यू’ असंही ऋतुजाने लिहिलंय.

gaurav more got married
ऋतुजा बागवेची पोस्ट

गौरवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. पण खऱ्या अर्थाने ‘सोनी मराठी’वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून तो घराघरात पोहोचला. या शोमधील त्याच्या विविध भूमिका आणि त्याची स्वतःवरच विनोद करण्याची शैली प्रेक्षकांना खूप भावली. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘बॉईज २’, ‘अल्याड पल्याड’ आणि ‘लंडन मिसाळ’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मराठीसह गौरवने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले आहे. त्याने राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या ‘रुही’ या चित्रपटात एक छोटी पण लक्षात राहणारी भूमिका साकारली होती.