scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली, ‘फू बाई फू’ही बंद होणार असल्याच्या चर्चेदरम्यान ओंकार भोजनेचं चाहत्यांना सरप्राईज, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

ओंकार भोजनेची नवी सुरुवात. अभिनेत्याच्या नव्या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली, ‘फू बाई फू’ही बंद होणार असल्याच्या चर्चेदरम्यान ओंकार भोजनेचं चाहत्यांना सरप्राईज, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
ओंकार भोजनेची नवी सुरुवात. अभिनेत्याच्या नव्या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. काही दिवसांपूर्वीच ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. त्याच्या या निर्णयानंतर चाहते त्याच्यावर नाराज झाले होते. आता तो झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात काम करताना दिसतो. पण हा कार्यक्रमही लवकरच बंद होणार आहे. म्हणूनच आता ओंकार मराठी चित्रपटांकडे वळला आहे.

आणखी वाचा – “अंगभर कपडे…” भगवी बिकिनी वादानंतर Fifa World Cup 2022साठी केलेल्या लूकमुळे दीपिका पदुकोण ट्रोल

‘फू बाई फू’ बंद झाल्यानंतर ओंकार कोणत्या कार्यक्रमात काम करताना दिसणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनाही होता. आता ओंकार चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल. त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझरही आता प्रदर्शित झाला आहे.

‘सरला एक कोटी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तर ओंकारचा हटके अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…

चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे. तर ओंकार व ईशासह छाया कदम चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. २० जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 17:58 IST

संबंधित बातम्या