छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील काही विनोदी कलाकार आता मोठ्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिचा ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रियदर्शनीचा पहिलाच चित्रपट आणि या चित्रपटात ती सुबोध भावेबरोबर मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे.
या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू असताना प्रियदर्शनीच्या कामाचं सगळेच जण कौतुक करत आहेत. तिच्यासाठी हा क्षण आनंदाचा आहे. याचदरम्यान तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना प्रियदर्शनीने दिलेलं कॅप्शन विशेष लक्षवेधी ठरत आहे. बॅकलेस ड्रेस परिधान करत पाठमोरी उभी असल्याचे फोटो प्रियदर्शनीने शेअर केले.

पण या फोटोंनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. हे फोटो शेअर करत असताना प्रियदर्शनीने म्हटलं की, “आता मागे वळून पाहणे नाही. आता ‘फुलराणी’ चित्रपटगृहांमध्ये पाहा”. तिच्या या पोस्टवर अनेकांनी गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी प्रियदर्शनीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…
पाठ दुखत आहे तर बाम लाव, टायगर बाम लाव गं बरं वाटेल. पुढे बघून चाल कारण पुढे धोका आहे, आता तुझा चेहरा कसा दिसणार, तुझ्या मागे कुत्रा लागला तर काय करणार?, मागे बघ तुझे पैसे पडले आहेत अशा अनेक गंमीतीशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. प्रियदर्शनी व सुबोधच्या ‘फुलराणी’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.