मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या आई व आदिनाथ कोठारेची आजी सरोज अंबर कोठारे यांचं निधन झालं आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आजीच्या निधनाची माहिती दिली आहे.

रवींद्र महाजनींचे पार्थिव पाहताच पत्नीला कोसळलं रडू; आईला सावरताना दिसला गश्मीर महाजनी

जानेवारी महिन्यात आदिनाथचे आजोबा अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. आता सहा महिन्यांनी त्याच्या आजीनेही अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. “स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा). संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” असं आदिनाथने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिनाथच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करून सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहत आहेत. महेश कोठारे यांना वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत मातृशोक झाला आहे. २१ जानेवारी २०२३ रोजी अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं.