Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात | mahesh manjrekar movie vedat marathe veer daudale saath akshay kumar as chatrapati shivaji maharaj look viral watch video | Loksatta

Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात

अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात
अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं. या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यानंतर अक्षयला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहण्यास प्रेक्षकही बरेच उत्सुक होते. आता अक्षयने ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षय ही भूमिका साकारणार असल्याचं कळताच अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील त्याचा लूक समोर आला आहे.

अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय चालत येताना दिसत आहे. या व्हिडीओमधये अक्षयची चाल, भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेत आहे. अक्षयला ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील अक्षय काहींना अजिबात पसंतीस पडला नाही. तर काहींनी त्याचं कौतुक केलं आहे. या भूमिकेसाठी शरद केळकरला का नाही घेतलं?, या भूमिकसाठी तुम्ही योग्य नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:41 IST
Next Story
Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न