Mahesh Manjrekar Praises Ata Thambaycha Naay: शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर यांच्यासह अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

‘आता थांबायचं नाय‘ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता थांबायचं नाय मधील सफाई कामगारांचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. आता एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाविषयी वक्तव्य केले आहे.

मी आशा करतो की…

महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘आता थांबायचं नाय’चे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. महेश मांजरेकर म्हणाले की दिग्दर्शकांची कमी नाही. पण, आता थांबायचं नाय हा चित्रपट मला सकारात्मक वाटत आहे. खूप चांगला चित्रपट वाटतोय. मी आशा करतो की या चित्रपटाने १०० कोटी कमवावेत. त्या चित्रपटात खरेपणा दिसतो.”

या चित्रपटात लोकप्रिय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्राजक्ता हणमघर, पर्ण पेठे, किरण खोजे हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

महेश मांजेरकर हे दिग्दर्शन व अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहे. तसेच, त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. नटसम्राट हा त्यापैकी एक चित्रपट आहे. विशेष बाब म्हणजे महेश मांजरेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

महेश मांजरेकर नुकतेच देवमाणूस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणेदेखील प्रमुख भूमिकेत दिसल्या. त्यानंतर महेश मांजरेकरांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मला मराठीची ताकद दाखवायची आहे, असे वक्तव्य केले होते. महेश मांजरेकर म्हणाले होते की या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची ताकद बास झालं. त्यात वाईट काही नाहीये. पण, त्यांनी ताकद दाखवली. आता मला मराठीचा एकच दणका द्यायचा आहे. कारण- महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे. छावा नावाच्या सिनेमाला ८० टक्के बिझनेस महाराष्ट्राने दिला आहे. महाराष्ट्राने ताकद दाखवली. आता ती मराठी सिनेमातून दाखवायची आहे.