"मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण..." महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा | mahesh manjrekar son satya manjrekar talk about dattaji paage role in vedat marathe veer daudale saat nrp 97 | Loksatta

“मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

“मी फक्त आणि फक्त वर्कआऊटवर लक्ष दिलं होतं.”

satya manjrekar vedat marathe veer daudale saat
मी यापूर्वी सलमान खानच्या जीममध्ये ट्रेनिंगसाठी जात होतो

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची दोन दिवसांपूर्वी घोषणा झाली. यानंतर हा चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात ७ प्रसिद्ध मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने सत्य मांजरेकर हा प्रसिद्धीझोतात आला आहे. यानिमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. त्यात त्याने त्याला हा चित्रपट कसा मिळाला, यासाठी तो काय काय मेहनत घेत आहे याबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच वडिलांच्या चित्रपटात काम करण्याबद्दलचा अनुभवही त्याने सांगितला. सत्य मांजरेकरने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्याने याबद्दलची भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले

सत्य मांजरेकर काय म्हणाला?

“बाबांच्या या चित्रपटात मी २०१८ पासून निश्चितच होतो. मला आधीपासूनच मी या चित्रपटात आहे हे माहिती होतं. मी या क्षणाची वाट बघत होतो आणि आज अखेर तो क्षण आला. मी त्यावेळी काहीही तयारी केली नव्हती. तेव्हा माझ्या वेगळ्या चित्रपटाचे शूटींग सुरु होते. तेव्हा मी त्याकडे पूर्ण लक्ष देत होतो. त्याबरोबरच हा चित्रपट तर होताच. पण करोनामुळे हा चित्रपट थोडा लांबणीवर पडला. आता मात्र वेळेत हा चित्रपट सुरु होणार आहे.

मी यासाठी फार मेहनत घेतली आहे. वर्कआऊट सुरु आहे. मी यापूर्वी सलमान खानच्या जीममध्ये ट्रेनिंगसाठी जात होतो. त्यावेळी मी पार्टी करणं किंवा इतर गोष्टी या सोडून दिल्या होत्या. मी फक्त आणि फक्त वर्कआऊटवर लक्ष दिलं होतं”, असे सत्य मांजरेकर म्हणाला.

आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत झळकणारा सत्य मांजरेकर नेमका आहे तरी कोण?

दरम्यान ‘वेडात मराठे वीर दौडले सात’या चित्रपटात सत्य मांजरेकर दत्ताजी पागे ही भूमिका साकारत आहे. सत्य मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे.सत्यने याआधी ‘फन अनलिमिटेड’ आणि ‘१९६२ द वॉर इन द हिल्स’मध्ये काम केलं आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-11-2022 at 13:26 IST
Next Story
हार्दिक-अक्षयाची लग्नघटिका आली जवळ; दोघांच्या लग्न पत्रिकेचा फोटो पाहिलात का?