Mamachya Govyala Jauya Box Office Collection Day 11 | अंकुश चौधरी, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २०२६ मधील ‘टॉप १० सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटां’च्या यादीत सामील झाला आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चे कलेक्शन किती, ते जाणून घेऊयात.

मामाच्या गोव्याला जाऊयाचे कलेक्शन

‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटाने ११ व्या दिवशी ५ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन १.९३ कोटी रुपये झाले आहे. तर भारतातील कमाई १.७२ कोटी रुपये आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने पहिल्या दिवशी ८ लाख रुपये, दुसऱ्या दिवशी २३ लाख रुपये, तिसऱ्या दिवशी ४१ लाख, चौथ्या दिवशी ११ लाख, पाचव्या दिवशी १३ लाख, सहाव्या दिवशी ९ लाख, सातव्या दिवशी ९ लाख, आठवड्या दिवशी ८ लाख, नवव्या दिवशी १९ लाख आणि १० व्या दिवशी २६ लाख रुपयांचे कलेक्शन केले.

मामाच्या गोव्याला जाऊयाचे बजेट

‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट ७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. चित्रपटाला बजेट वसूल करण्यासाठी अजून ५.२८ कोटी रुपयांच्या कमाईची गरज आहे. म्हणजेच चित्रपटाला अजून जास्त प्रेक्षक मिळायला हवे. चित्रपटाने आतापर्यंत आपल्या बजेटपैकी २४.६% रक्कम वसूल केली आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बनला नववा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट २०२६ मधील नववा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘तिघी’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘तिघी’ने १.६४ कोटींचे कलेक्शन केले होते, तर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने एकूण १.९३ कोटींची कमाई केली आहे.

२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारे मराठी सिनेमे

१. राजा शिवाजी: १०५.६८ कोटी रुपये
२. देऊळ बंद २: १०० कोटी रुपये
३. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम: २७.८१ कोटी रुपये
४. तुम्बाडची मंजुला: १६.४७ कोटी रुपये
५. अगं अगं सूनबाई! काय म्हणता सासूबाई?: ८.९७ कोटी रुपये
६. घबाडकुंड: ७.४१ कोटी रुपये
७. सुपर डुपर: ३.४४ कोटी रुपये
८. भूतम भयम: २.९६ कोटी रुपये
९. मामाच्या गोव्याला जाऊया: १.९३ कोटी रुपये
१०. तिघी: १.६४ कोटी रुपये

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या विजू माने दिग्दर्शित मराठी चित्रपटात अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय चित्रपटात अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका व कॅमिओमध्ये झळकले आहेत.