मागचे काही महिने आपल्या घटस्फोटामुळे सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक होय. मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षांत मानसी व प्रदीप वेगळे झाले. त्यानंतर मानसी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे तिच्या आयुष्याबद्दल भाष्य करत असते. अशातच आता होळीच्या सणानिमित्त मानसीने काही फोटो शेअर केले आहेत.
वडिलांनी लहानपणी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा करणाऱ्या खुशबू सुंदर कोण आहेत?
मानसीने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंना “एक ही बात सिखती हू मै रंगों से, अगर निखरना है तो बिखरना भी जरुरी है” असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसेच तिने होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
मानसी नाईकच्या या फोटोंवर चाहत्यांनी ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असं म्हणत हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही जणांनी मानसीला होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.