Mangesh Desai Celebrates Parents Sahastrachandra Darshan Sohala: मंगेश देसाई हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी काही सिनेमांची निर्मितीदेखील केली आहे. राजवाडा, ब्लाईंड गेम, भागुबाई, एका लग्नाची गोष्ट, सर्वनाम, मसाला, फ्री स्टेट, जलसा, निशानी डावा अंगठा, इश्कवाला लव्ह, अशाच एका बेटावर, वाजवूया बँडबाजा, अंकुश, हुप्पा हुय्या, जजमेंट, बाबा लगीन, धर्मवीर, धर्मवीर २ अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केले आहे. ते विविध धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

याबरोबरच मंगेश देसाई सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ते विविध पोस्ट, व्हिडीओ शेअर करीत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आई-वडिलांना बदललेली मुंबई दाखवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले होते.

मंगेश देसाईंनी ‘असा’ साजरा केला आई-वडिलांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा

आता मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या आई-वडिलांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मोठी पाटी दिसते. त्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा, जीवन व सौ. प्रभावती देशपांडे, असे लिहिलेले आहे. त्यानंतर मंगेश देसाईंच्या आई-वडिलांची एन्ट्री होते. ते खास पारंपरिक वेशभूषेत तयार झाल्याचे दिसत आहेत. त्यांनी गळ्यात हार घातले आहेत. त्यानंतर पूजा, होम पाहायला मिळतो. मंगेश देसाई पत्नीसह आई-वडिलांचे पाय धुतात.

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, आई-वडिलांची पुस्तकाबरोबर तुला केली जाते. एका बाजूला आई आणि एका बाजूला पुस्तके पाहायला मिळतात. पुढे एका बाजूला वडील आणि दुसऱ्या बाजूला पुस्तके पाहायला मिळतात. त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहायला मिळत आहे.

मंगेश देसाईंनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “१००० पौर्णिमा बघण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं. त्यातले माझे आई-दादा आणि ते साजरा करण्याचं भाग्य खूप कमी परिवारांना लाभतं, त्यातले आम्ही. आई-दादा जय हो”, असे लिहित त्यांनी आनंद व्यक्त केला.

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, वाह! खूप छान क्षण, आई-बाबा सुंदर दिसत आहेत आणि तुम्हीपण खूप नशीबवान आहात. खूप खूप शुभेच्छा. आणखी एकाने लिहिले, “पुत्र लाभावा ऐसा मंगेशदादासारखा.” एकाने लिहिले, “खूप मस्त.” दुसऱ्याने लिहिले, “खूप सुंदर”, अशा अनेकविध कमेंट्स लिहिल्या गेल्या आहेत.

त्याबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील कमेंट्स करीत कौतुक केले आहे. प्रवीण तरडेंनी लिहिले, “मंगेश, काय भारी कार्यक्रम झाला. तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तता दिसत होती. तुझा अभिमान वाटतो”, योगिनी चौकने लिहिले, “किती सुंदर, अभिमानास्पद क्षण.” याबरोबरच, शर्मिष्ठा राऊतनेदेखील इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

मंगेश देसाईंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करीत त्यांचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.