Mangesh Desai Reveals Harsh Truth About Marathi Industry : मराठी इंडस्ट्रीची अवस्था खूप वाईट आहे, मराठी चित्रपट थिएटरमध्ये चालत नाही, ते फ्लॉप ठरतात अशी अनेक वक्तव्ये कानी पडत असतात. बऱ्याचदा चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीच आणि काहीवेळा चित्रपट केवळ व्यवसाय म्हणून केले जातात असंही अनेकांचं म्हणणं असतं. अशातच आता मराठी इंडस्ट्रीत निर्माते म्हणून नव्याने ओळख मिळवलेले अभिनेते मंगेश देसाई यांनी मराठी इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे.

मंगेश देसाई यांनी आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम करत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकपसंती मिळवली आहे मात्र, तरीसुद्धा त्यांना अभिनयात अपेक्षित यश मिळालेलं नाही आणि याची खंतीही त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याबद्दल आणि अभिनयासह निर्माता म्हणून काम करत असतानाचा अनुभव तसंच सध्याची मराठी सिनेसृष्टीची परिस्थिती याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पण, यामधून त्यांनी मराठी इंडस्ट्री धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. आता ते नेमकं काय म्हणालेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयता…

मराठी इंडस्ट्री धोक्यात – मंगेश देसाई

मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत त्यांना निर्माता म्हणून इंडस्ट्रीतीबद्दल काय वाटतं असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “निर्माता म्हणून मला इंडस्ट्री खूप धोक्यात आहे असं वाटतं. मराठी सिनेमा मोठा व्हायलाच पाहिजे, तो जगलाच पाहिजे यात वाद नाही, पण मला आता धोक्याची घंटा दिसतेय. कारण- कुठलाही चॅनेल नवीन निर्मात्याचा सिनेमा घेत नाही. ओटीटी चॅनेलनेसुद्धा फक्त पेपर व्हिह्यु तेसुद्धा आम्हाला आवडला तर या नोटवर असतात. नाहीतर तुमचं तुम्ही बघा, किंवा यूट्यूब चॅनेलवर तुम्ही चित्रपट टाका. त्यामुळे मला परिस्थिती खूप गंभीर दिसतेय. या परिस्थितीत निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकमेकांना फसवत राहिलो किंवा एकमेकांशीच आपल्या कलाकृतींबद्दल खोटं बोलत राहिलो तर मराठी सिनेमा मोठा होणार नाही.”

मंगेश देसाई पुढे म्हणाले, “अनेक लोक मला भेटायला येतात की या सिनेमाचं काहीतरी करा. पण मी स्पष्ट सांगतो की मी काहीच करू शकत नाही. कारण मार्केटची परिस्थिती लक्षात आल्यानंतर काहीच करू शकत नाही.” पुढे त्यांना सिनेमे चालतात, तिने-चार दिवसांत कोट्यवधी कमावल्याचे बोर्ड लागतात. मग ते खरे असतात का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “त्याबाबतीत मला संशय आहे. कारण – जर विचार केला तर एवढा व्यवसाय इतक्या दिवसात कसा होईल. मला असं वाटतं की आकडे खरे असावे. ही जबाबदारी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची आहे. खोटे आकडे देऊन फक्त तोटा होणार आहे. कारण- अशा पद्धतीचा सिनेमा चालतोय कळल्यानंतर तसेच सिनेमे बनवले जातात पण, मग कळतं की नाही परिस्थिती वेगळी आहे.”