scorecardresearch

Premium

मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, प्रतिक्रिया देत म्हणाले…

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित चित्रपट कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली माहिती

Manoj Jarange Patil Film
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं नाव ठरलं

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. सरकारने अध्यादेश दाखवल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या संघर्षाची लोकांना माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता त्या चित्रपटाच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे, तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष चित्रपटातून उलगडणार! प्रश्न विचारताच म्हणाले, “हा नवीनच…”

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
alibaba ani chalishitale chor
‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचे पोस्टर चर्चेत
viju-mane-marathi-industry
मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन चरित्रावर व त्यांनी केलेल्या मराठा समाजासाठी संघर्षावर लवकरच एक मराठी चित्रपट येणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते शिवाजी दोलताडे यांनी दिली. शिवाजी दोलताडे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे भेट दिली. त्यावेळी ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. चित्रपटाचे चित्रीकरण हे डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे, तर मार्च महिन्याच्या शेवटी हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते शिवाजी दोलताडे यांनी दिली आहे.

“सर्वांसमोर मुलांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं अन्…”, एन्फ्लुएन्सर मृणाल दिवेकरचा संताप; म्हणाली, “शिक्षकांना…”

“चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सराटी गावातून होईल, तसेच त्यांचं जन्मगाव व मुंबई इथेही त्याचं चित्रीकरण केलं जाईल. यांच्यावर चित्रपट करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा संघर्ष लोकांसमोर येणं गरजेचं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. त्यांचा खरा संघर्ष खूप जुना आहे पण लोकांना त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट बनवत आहोत. मनोज जरांगे पाटलांची भूमिका रोहन पाटील करणार आहे,” अशी माहिती शिवाजी दोलताडे यांनी दिली. दोलताडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

चित्रपटाचं पोस्टर पाहून मनोज जरांगे पाटलांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यांना चित्रपटाचं पोस्टर खूप आवडलं. तसेच त्यांनी ‘चित्रपटाला खूप शुभेच्छा’ असं पाटील म्हणाले असं दोलताडेंनी सांगितलं. चित्रपटासाठी काही माहिती हवी असेल तर त्यांच्या जवळचे लोक माहिती देतील, असं शिवाजी दोलताडे यांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil biopic name sangharsh yoddha poster release check his reaction hrc

First published on: 12-09-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×