"आमच्यात काही गोष्टी..." वैवाहिक आयुष्यात त्रास सहन करत होती मानसी नाईक, आता राहते एकटी | mansi naik talk about her married life and advice to others about marriage see details | Loksatta

“आमच्यात काही गोष्टी…” वैवाहिक आयुष्यात त्रास सहन करत होती मानसी नाईक, आता राहते एकटी

अभिनेत्री मानसी नाईक आज तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

Manasi Naik Pradeep Kharera
अभिनेत्री मानसी नाईक आज तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

अभिनेत्री मानसी नाईक हिचा आज वाढदिवस. मानसी तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तिच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मानसीने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं जाहिर केलं. दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू आहे. यादरम्यान मानसीने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – मंडप सजला, नवरी नटली अन्…; वनिता खरातचा नववधू लूक समोर, मराठी कलाकारांची लग्नासाठी हजेरी

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसीने घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. यावेळी “घटस्फोटासाठी मी अर्ज दिला आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरु आहे.” असं मानसीने सांगितलं होतं. शिवाय घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या असल्याचंही मानसीने स्वतः स्पष्ट केलं.

“नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे सगळं खूपच वेगात घडलं. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.” असं मानसीने मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. मानसी तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नसल्याचंही तिने स्पष्टपणे सांगितलं.

आणखी वाचा – वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

“अलिकडे बरेच लोक मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसतात. जोडीदाराने एकमेकांना कसं समजून घ्यावं, एकमेकांशी कसं बोलावं याबाबत सांगतात. पण जर तुमच्या नात्यात समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा.” असा सल्ला मानसीने यावेळी दिला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 16:04 IST
Next Story
Video : लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुलची जोरदार पार्टी, एकमेकांना केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल