एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या संपूर्ण स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज कामगिरी केली. सलग १० सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय संघाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने २४१ धावांचं लक्ष्य ४३ षटकात ६ विकेट्स शिल्लक असताना सहज गाठलं. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. भरमैदानात भारतीय क्रिकेटर्सना अश्रू अनावर झाले. सध्या सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण कर्णधार रोहित शर्मा कुठे चुकला याविषयी बोलत आहेत, तर काही जण भारतीय संघाला अजूनही पाठिंबा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी अंतिम सामना हा वानखेडेलाच झाला पाहिजे होता असं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Marathi Marwadi conflict in Mumbai
Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी अनेक मराठी कलाकार अहमदाबादला पोहोचले होते. तर काही जण घर बसल्या आनंद घेत होते. पण भारताच्या पराभवानंतर बऱ्याच मराठी कलाकारांनी नाराजी व्यक्ती केली. काही जणांनी टीव्ही बंद केला, अशी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली, तर काही जणांनी भावुक इमोजी स्टोरीला शेअर केले.

अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांनी अंतिम सामना वानखेडेलाच झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं. दोघांनी या आशयाची इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या कृतीने वेधलं लक्ष, आशा भोसलेंच्या हातात कप पाहिला अन्…

हेही वाचा – अमृता देशमुखच्या वहिनीने दिल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “अभी तो…”

दरम्यान, अभिनेत्री प्रिया बापट, सई ताम्हणकर, अमेय वाघ, अभिजीत केळकर, जुई गडकरी, केदार शिंदे, रितेश देशमुख, हेमांगी कवी अशा अनेक मराठी कलाकरांनी या सामन्याबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत.

Story img Loader